शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगले तालुक्यात स्थानिक मटका तेजीत,तीन बुक्कीमालकांची सुभेदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 23:07 IST

हातकणंगले : येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २१ गावांमध्ये मटका खेळणाºया आणि गोळा करणाºया ग्राहकांनी मुंबई- कल्याणकडे पाठ फिरविली असून, रुकडी, हातकणंगले आणि मुडशिंगी या स्थानिक पातळीवरील बुकी मालकांच्या ओपन व क्लोजच्या

ठळक मुद्देपोलिसांचे दुर्लक्ष : २१ गावांमध्ये विस्तारले जाळे,

दत्ता बिडकरहातकणंगले : येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २१ गावांमध्ये मटका खेळणाºया आणि गोळा करणाºया ग्राहकांनी मुंबई- कल्याणकडे पाठ फिरविली असून, रुकडी, हातकणंगले आणि मुडशिंगी या स्थानिक पातळीवरील बुकी मालकांच्या ओपन व क्लोजच्या लकी नंबरवर नशीब आजमावयाला सुरुवात केल्यामुळे स्थानिक मटका तेजीत आहे.

हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २१ गावांमध्ये स्थानिक बुक्कीमालकांनी स्वत:च्या हिमतीवर मटकाबुक्कीचा डोलारा उभा केला आहे. २१ गावांची तीन बुक्कीमालकांनी सुभेदारीच्या वाटणीप्रमाणे वाटणी करून घेऊन आपल्या व्यवसायाची पाळेमुळे घट्ट केली आहेत. तीन बुक्कीमालकांनी गावांची वाटणी करून घेताना एकमेकांच्या हद्दीत हस्तक्षेप करायचा नाही, असा आलिखित करारच करून घेतला आहे.हेरलेपासून रुकडीपर्यंत तसेच पेठवडगाव परिसरासह पुलाची शिरोली परिसरातील अतिग्रे, चोकाक, माले, मुडशिंगी, हेरले, हालोंडी, नागाव, शिरोली, मौजे वडगाव, तासगाव, टोपपर्यंतचा भाग मुडशिंगी येथील बुक्कीमालकाने आपल्याकडे घेतला आहे. तर रुकडी, माणगाव, रुई, साजणी, तिळवणी, नदीपालीकडील पट्टणकोडोली, इंगळी, तळंदगेपर्यंतचा भाग रुकडीच्या बुक्कीमालकाकडे. हातकणंगलेसह औद्योगिक वसाहत आळते, लक्ष्मीवाडी, बिरदेववाडी, नरंदे, कुंभोज, हिंगणगाव, मजले, तारदाळ, कोरोचींमध्ये हातकणंगलेच्या बुक्कीमालकाने जम बसविला आहे.अनेक कुटुंंबे उद्ध्वस्ततीन बुक्कीमालकानी मुंबई, कल्याणच्या मटक्याची वाट न पाहता सामुदायिक तिघांनी मिळून ज्या त्या दिवसाच्या मागणीप्रमाणे आणि फायद्याप्रमाणे ओपन आणि क्लोजचालकी नंबर जाहीर करून स्वत:च्या मटका व्यवसायाचे बस्तान बसविले आहे. या संपूर्ण मटका व्यवसायाकडे पोलिसानी मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.पोलीस अधीक्षक आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक यांनी स्वतंत्र आदेश देऊन कारणे दाखवा नोटीस देऊनही स्थानिक मटका जोरात असल्यामुळे पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट होत आहे.